Followers
Wednesday, 17 October 2012
Tuesday, 9 October 2012
Friday, 28 September 2012
माझी खवय्येगिरी
माझी खवय्येगिरी
चटपटीत खाण्याची आवड सर्वांनाच असते तशी मला पण आहे ...नवीन पदार्थ करूनबघणे हा छंद
मी नेहमी जोपासला आहे...त्यापैकी हे एक सोयाबीन चे कालवण करून मी घरी सर्वांना खाऊ घातली
नेहमी पेक्षा वेगळी भाजी सर्वांनी घरी आवडीने खाल्ली ..याला आमटी किवा सोयानीन चे
झक्कास आळण असेही म्हणता येईल ..त्यासाठी शेतातील हिरव्या शेंगा आणून त्याचे दाणे काढून
घ्यावे लागतात.मार्केट मध्ये मिळाले तर उत्तमच ..
* लागणारे साहित्य ....२ वाट्या हिरवे सोयाबीन चे दाणे ,एक हिरवीमिरची तिखट खाणारे २ वापरू
चटपटीत खाण्याची आवड सर्वांनाच असते तशी मला पण आहे ...नवीन पदार्थ करूनबघणे हा छंद
मी नेहमी जोपासला आहे...त्यापैकी हे एक सोयाबीन चे कालवण करून मी घरी सर्वांना खाऊ घातली
नेहमी पेक्षा वेगळी भाजी सर्वांनी घरी आवडीने खाल्ली ..याला आमटी किवा सोयानीन चे
झक्कास आळण असेही म्हणता येईल ..त्यासाठी शेतातील हिरव्या शेंगा आणून त्याचे दाणे काढून
घ्यावे लागतात.मार्केट मध्ये मिळाले तर उत्तमच ..
* लागणारे साहित्य ....२ वाट्या हिरवे सोयाबीन चे दाणे ,एक हिरवीमिरची तिखट खाणारे २ वापरू
शकतात.एक चम्मच आले लसून पेस्ट,२ लसून पाकळ्या थोड जिरे,फोडणीस कांदा आणि एक
टोमाटो..
* कृति -दाने धुवून घ्यावीत,तव्यावर दाणे,बिया काढलेली हिरवी मिरची,२-३ लसून पाकळ्या,
थोडे जिरे टाकावे व खरपूस पण हलके भाजावे
सर्व एकत्र मिक्सर मधून बारीक वाटून घ्यावे थोडे जाडसर ..
२ मोठे चमचे तेल एका पातेल्यात गरम करावे त्यात कांदाथोडा लालसर होऊ द्यावा,
त्यात लसून पेस्ट, लाल तिखट अर्धा चमचा व थोडी हळद टाकावी .
त्यानंतर चिरलेले टोमाटो टाकून जरा तेलात परतून घ्यावी ...
मिक्सर मधून वाटलेले मिश्रण काढून त्यात पाणी टाकून गरम फोडणीत टाकावे..
वरून गरम केलेले एक ग्लास गरम पाणी टाकावे चावी पुरते मीठ आणि वरून एक
छोटा चम्मच गोडा मसल टाकावा...४-५ मिनिटे उकळी येवू द्यावी व कोथिंबीर
टाकून गरम चपाती सोबत किवा भाता सोबत सर्व्ह करावी...
हे आळण एकदा खाल्ल्यावर नेहमी खावेसे वाटेल. भाजी न खाणारा माझा मुलगा जेवताना
परत परत मागतो...साधे पण चवदार असे हे आळण ..
.......सुरेखा वानखडे.....
Thursday, 27 September 2012
विसर्जन
गणपती विसर्जना नंतरचा
टिळकांनी सार्वजनिक गणेशोस्तव लोकांना एकत्र आणण्यासाठी सुरु केला .हे सर्वांना माहित
आहे हा इतिहास परत काय सांगत आहे असे वाटेल पण नुसते गणपती बसवणे नव्हे तर
एकता निर्माण करणे तसेच जनजागृत हा एक उद्देश होता...पण आता त्याचे स्वरूप काय तर
दहा दिवस धांगड धिंगा मोठ्याने गाणे त्यातही चिकणी चमेली सोबत शीला जोरात वाजते ..
असे हे कानठळ्या वाजवीत लोकांचे मनोरंजन अभिप्रेत नवते टिळकांना ...
आता समारोपाची वेळ आलीय..त्यातही काही वेगळे असे दृश्य नाही .जोराने ब्यांड
वाजवीत नाचत गात नेऊन सरळ नदीत शिरवणे पाहत बसेल प्रशासन आपले काय?
मनात आणले तर आपणच हे सर्व काही वेगळे करू शकतो ..बघा कसे मातीचा गणपती
असेल तर घराचा घरी एका मोठ्या भांड्यात पाणी घेऊन विधिवत त्यात तुम्ही मूर्ती
विसर्जित करू शकतो ...पण ती मूर्ती प्लास्टर ऑफ परीस ची नसायला पाहिजे .
काय कि ती माती घरच्या झाड्डांना उपयोगात येईल ...निर्म्माल्ल्या एका खड्ड्यात
पुरून त्यावर माती टाकून ठेवल्यास चांगले खत मिळेल..
नुसता डीजे लावून नाचून आपण मोडर्ण आहोत असे भासवण्या पेक्षा आपण
निसर्गाची काळजी घेतो हे समाधान औरच आहे ...गावातील मोठे गणपती जेव्हा नदी
मध्ये तसेच शहरात समुद्रात विसर्जित करतात त्यावेळी कोणीही हा विचार का नाहीत कि
मूर्तीवरील कृत्रिम रंगाने पाण्यात प्रदूषण होत आहे..जर याकडे लक्ष दिले तर हजारो जीव
जे या प्रदूषणामुळे मारतात ते तुम्हाला दुआ देतील. नुसते पाण्यातील मासे, बेडूक, कासव
चा नाही तर दुषित पाणी पिल्याने ज्या जनावरांना विषबाधा होते ते सुद्धा .....आमचा इथे
एक इथे नेचर ग्रुप आहे जो सर्व निर्म्मल्या कचरा मोठ्या कचरा पेटीत टाकण्याचे सतत
आवाहन करीत असतो..त्यावर एक फिल्म सुद्धा बनवली आहे जी कार्यक्रमात दाखवतो .
तसा सर्वांनी एक ग्रुप बनवून आपल्या निसर्गाची काळजी घेतली तर..हा एक स्तुत्त्य
उपक्रम ठरेल... जसे तुम्ही चांगले फोटोग्राफर असाल तर पाण्यात गणपतीचे काय हाल
होतात,कचऱ्याचे ढीग जमा होवून कसे प्रदुषण करतात याचे फोटो काढून जनजागृती
करू शकता..उद्देश हा कि लोकांमध्ये थोडा अवेरनेस यावा...
...सुरेखा..
Tuesday, 25 September 2012
मनःस्वी
ती आली ....एका मनःपटलावर....
स्वतःचा चेहरा शोधत बसली.......
एका मनःस्वीतेने एका मनःस्वी,
मनाला डोळे उघडण्यास विनविले ........
मी आहे ,मी तिथेच आहे .........
आसपास तुझ्या.......
कासावीस हाक मारते आहे ....
खोल ना दार .....
कोण असेल ही .........
ashi mi.......
एवढयात दिवस फार छान वाटत आहे .........
मनालाही फार बरे आहे .........
मनाची धावपळ जरा थांबली आहे .......
मनाच्या गाभाऱ्यात शांती आहे
सुंदर विचारांच्या,मंद प्रकाशांच्या .......
सतेज पणत्या तेवत आहे........
माझीच मी आहे ....
गुंग मी माझ्यात आहे.....
हि संध्याकाळ फार छान आहे ....
पाखरांचे थवे ओढ लावीत आहे.....
संध्याकाली च्या दाट सावल्या...
आता कळवळत नाहीत ..........
मंद सुरात त्या गीत......
गुणगुणायला लागल्या आहेत .....
हा अंधार मस्त खळाळत आहे........
सौंदर्याचे लेणे त्याला लाभले आहे.....
आज कसं मस्त वाटत आहे .....
उद्या हे सुवर्णा दिवसा तू कसा आहे ........
सुरेखा ......
मनालाही फार बरे आहे .........
मनाची धावपळ जरा थांबली आहे .......
मनाच्या गाभाऱ्यात शांती आहे
सुंदर विचारांच्या,मंद प्रकाशांच्या .......
सतेज पणत्या तेवत आहे........
माझीच मी आहे ....
गुंग मी माझ्यात आहे.....
हि संध्याकाळ फार छान आहे ....
पाखरांचे थवे ओढ लावीत आहे.....
संध्याकाली च्या दाट सावल्या...
आता कळवळत नाहीत ..........
मंद सुरात त्या गीत......
गुणगुणायला लागल्या आहेत .....
हा अंधार मस्त खळाळत आहे........
सौंदर्याचे लेणे त्याला लाभले आहे.....
आज कसं मस्त वाटत आहे .....
उद्या हे सुवर्णा दिवसा तू कसा आहे ........
सुरेखा ......
My Heart speaking
माझी मी
कधीतरी असे वाटते .............
क्षणात विझावे एक अंधार बनून ......
काळोखाच्या झुल्यात झुलत राहावे ...
एक चैन म्हणून,
जीवाचा विरंगुळा म्हणून ......
कधीतरी असे वाटते..........
हसावे.....?नाही रडावेच ,
आसवांच्या पुरात जावे ......
धो धो करीत संपून जावे
हलके हलके होऊन जावे .....
भावनांची वादळे नकोत म्हणून ,
दुखाचा निचरा व्हावा म्हणून ............
कधीतरी असे वाटते .............
ह्या मनाला बरं वाटावं ,
पानांशी गुजगोष्टी कराव्यात.....
फुलांशी हितगुज करावं,
वाहत्या नदीला थांबवावं.....
उद्धाम वाऱ्याला रागवावं,
आकाशाशी मस्ती करणाऱ्या,
वाळक्या पानागत क्षणात हलकं व्हावं ....
आभाळागत व्हावं म्हणून ...
जीवाला बरं वाटावं म्हणून.......
Saturday, 22 September 2012
indradhanu
इंद्रधनू
चांदण्याच्या ताटव्यात अलवार ...
विसावणे माझे ,
हलकेच स्वप्नातल्या कळ्यांना ,
जाग येणे .........
पाकळ्या पाकळ्या उमली......
मनाच्या नेई मज,
स्वप्न सुवर्णी अलगद,
मन हे ऐकेना लहरत जाई
ताटव्यात फुललेल्या,
कळ्यांना ओंजळीत घेई .......
ओंजळीत उमली ती स्वप्ने .....
रोमा रोमात भिनत जाणे....
जणू मृगाचा पहिला पाऊस .....
बरसत जाणे .......
चांदण्याचा ताटव्यात अलवार..
विसावणे माझे ....
हलकेच स्वप्नातल्या कळ्यांना
जाग येणे..............
चांदण्याच्या ताटव्यात अलवार ...
विसावणे माझे ,
हलकेच स्वप्नातल्या कळ्यांना ,
जाग येणे .........
पाकळ्या पाकळ्या उमली......
मनाच्या नेई मज,
स्वप्न सुवर्णी अलगद,
मन हे ऐकेना लहरत जाई
ताटव्यात फुललेल्या,
कळ्यांना ओंजळीत घेई .......
ओंजळीत उमली ती स्वप्ने .....
रोमा रोमात भिनत जाणे....
जणू मृगाचा पहिला पाऊस .....
बरसत जाणे .......
चांदण्याचा ताटव्यात अलवार..
विसावणे माझे ....
हलकेच स्वप्नातल्या कळ्यांना
जाग येणे..............
Monday, 17 September 2012
swapna gandha
स्वप्न हे जगण्याचे,स्वप्न हे
तुझ्यात हरवण्याचे ......
तुला का कळेना मूक भाषा ही ,
मनातल्या वादळाची ...........
मनातल्या देव्हाऱ्यात,
सदा उजळे ज्योत मृदुगन्धाची......
तुही हरव ना माझ्यासवे ,
अंतरीतल्या गंध रंगा मधे.......
तुला का कळेना मूक भाषा हि,
मनातल्या मृदुगन्धाची ...........
स्वप्नातील सत्त्या मध्ये,
सापडेल का कोणी तु ...........
कि जागेपणाचा बहाणा करीत ,
हरवशील का माझ्या खऱ्या स्वप्नात तू ........
जगायचे मला तुझ्या सवे ,तुझ्यामध्ये ,
तुला का कळेना ही मूक भाषा,
मनातल्या जगण्याची..............
आठवण
आठवांच्या सांजवेळी
पापण्यांनी केली मुजोरी
एक एक आठवणींच्या ,
गर्तेत नेत नेत ,
स्वप्नांची शिदोरी ,मला सतावी बावरी ..........
नको हि मला ,
छळवणूक तिन्ही त्रिकाळी ,
हि सरत गेलेली रात्र ,
का एवढी वाढली ह्या पावसाळी...........
नात्याची नव्हाळी ,
कधीचीच हरवली ,
शोधता शोधता ,
जन्म हि संपेल ,
पण आता दिसणार नाही ........
का वादळाशी मैत्री करावी ,
माहित आहे जन्म संपेल
वादळे संपणार नाहीत..........
Friday, 24 August 2012
Subscribe to:
Posts (Atom)